Dehanagarichi Adbhut Safar

-20% Dehanagarichi Adbhut Safar

आपल्या पापणीची प्रत्येक उघडझाप किंवा हृदयाचा प्रत्येक ठोका पेशींनी पुरवलेल्या ऊर्जेशिवाय अशक्य आहे. आणि विशिष्ठ इंधन मिळाल्याशिवाय पेशी आवश्यक ऊर्जेची निर्मिती करू शकत नाहीत. पेशींना होणारा या इंधनाचा पुरवठा आपल्या उदराच्या पोकळीत अत्यंत छोट्या अडचणीच्या जागेत वास्तव्य करणाऱ्या स्वादुपिंडाकडून म्हणजे पँक्रियाकडून केला जातो.

सांगायचा मुद्दा इतकाच की, आपण मनुष्यप्राणी म्हणून ज्या हलचाली करतो किंवा जी कृती करतो ती प्रत्यक्षात आपले अवयव घडवून आणत असतात. त्यामागे विशिष्ट प्रसंगी घडून येणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आणि त्यातून कार्यान्वित होणारी संदेशवहणाची अजब यंत्रणा आपल्या शरीरात कार्यरत असते आणि ही यंत्रणा आपल्या शरीरातील अवयवांच्या परस्परपूरक सहकार्यातून चालते. तेव्हा आपल्या एखाद्या जरी अवयवाने कामचुकारपणा केला किंवा विशिष्ट वेळी विशिष्ट काम केलं नाही, तर आपल्या शरीराचा डोलारा ढासळू शकतो. तेव्हा जाणून घ्या आपल्या शरीर नामक यंत्राची गोष्ट आपल्या इंद्रियांच्या तोंडून.

आपल्या शरीराची अद्भुत, विस्मयकारी रचना उलगडून दाखवणारं आणि प्रत्येक अवयवाचं आपल्या शरीरातील स्थान व महत्त्व समजून घेत त्याची निगा कशी राखावी हे सांगणारं हे पुस्तक अबालवृद्धांनी मिळून वाचावं असंच आहे.

Dehanagarichi Adbhut Safar 
देहनगरीच अद्भुत सफर
Dr. Vrinda Chapekar
डॉ. वृंदा चापेकर

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dr. Vrinda Chapekar

  • No of Pages: 136
  • Date of Publication: 25/02/2021
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-90060-28-3
  • Availability: 20
  • Rs.350.00
  • Rs.280.00