Palakshaala

-20% Palakshaala

पालकत्व निभावणं म्हणजे मुलांना त्यांच्या अनिश्चित अशा भविष्यकाळात सक्षमपणे उभं राहण्यासाठी तयार करणं. हे, मुलांना प्रेमाने वाढवणं, त्यांना हवं नको ते बघणं त्यांच्या शिक्षणाची तरतूद करणं, त्यांनी काय करावं आणि काय करू नये यासंदर्भात निर्णय घेणं याहीपेक्षा अधिक व्यापक आहे. पालकत्व ही अधिक विचारपूर्वक निभावण्याची बाब आहे. त्यामुळे पालकत्वाचे विविध आयाम जर आपण समजून घेतले तर अधिक जबाबदारीने आपण ते निभावू शकतो.

पालकशाळा या पुस्तकातून मानसोपचारतज्ज्ञ, डॉक्टर्स, समुपदेशक, शिक्षण अभ्यासक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पालकत्वाचे हे विविध पैलू उलगडून दाखवलेले आहेत. पालक म्हणून दैनंदिन स्वरूपात आपल्यासमोर असणारे प्रश्न आणि त्यांच्या सोडवणुकीचे विविध पर्याय मांडलेले आहेत.

हे पुस्तक आपला मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक तर करतंच पण त्याचबरोबर मुलांच्या अंगभूत क्षमता, वयाच्या विविध टप्प्यांवर त्यांना येणार्या अडचणी, शारीरिक मानसिक बदल, त्याचे होणारे परिणाम आणि अर्थातच त्यातून निर्माण होणारे प्रश्न यांच्या सोडवणुकीचे मार्गही दाखवतं.

नवे शास्त्राधार समजावून देत मुलांच्या बुद्धिमत्ता विकासाचे विविध पर्याय समोर ठेवतं, मुलं आणि करियर या संदर्भातले तिढे सोडवण्यासाठी मदत करतं.

पालकत्वासंदर्भातली आपली जाणीव अधिक व्यापक करणारं हे पुस्तक प्रत्येकानं वाचलंच पाहिजे.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dr.Shriram Geet

  • No of Pages: 180
  • Date of Publication: 01/01/2021
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-90060-24-5
  • Availability: 49
  • Rs.225.00
  • Rs.180.00