Payapit Samajwadi, Lade ani Tide, Fakirche Vaibhav

-20% Pre-Order Payapit Samajwadi,  Lade ani Tide, Fakirche Vaibhav

।। राजकीयसामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत स्वतःला झोकून देणाऱ्या

ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या प्रेरणादायी आत्मकथांचा संच ।।

1. पायपीट समाजवादासाठी - एका निष्ठावंताचं आत्मकथन - पन्नालाल सुराणा

2. लढे आणि तिढे - चिकित्सक गप्पा..... पुष्पाबाईंशी - मुलाखत मेधा कुळकर्णी

3. फकिरीचे वैभव- एका कार्यकर्त्याचे वेदनाकथन  - विजय यशवंत विल्हेकर

त्यातली एक कहाणी विचारांवर निष्ठा असणं म्हणजे काय याचं भान देणारी!

दुसरी आवेशाने दिलेल्या लढ्याची आणि तितक्याच अलवारपणे सोडवलेल्या तिढ्याची!!

आणि तिसरी आहे फकिरीचे वैभव काय असत याच दर्शन घडवणारी!!! 


1. पायपीट समाजवादासाठी   

एका निष्ठावंताचं आत्मकथन

पन्नालाल सुराणा

Payapit Samajwadasathi

Eka Nishthawantache Atmakathan

Pannalal Surana

पाने : 296, मूल्य : 350

पुस्तकाचा आकार ५.५ x 8.5 इंच

संसदीय व सत्याग्रही लोकशाही मार्गाचा अवलंब करून आणि व्यक्तिस्वातंत्र्याला केंद्रस्थानी ठेवून आर्थिक समतेच्या पायावर समाजाची निर्मिती करण्याची आवश्यकता व इष्टता प्रतिपादन करणारी विचारसरणी म्हणजे लोकशाही समाजवाद. त्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणार्‍या एका सच्चा कार्यकर्त्याचा हा जीवन प्रवास. आयुष्यात व्यक्तिगत जीवनापेक्षा सार्वजनिक जगण्याला प्राधान्य दिलं गेलं की, व्यक्तिगत असं फारसं काही उरत नाही. अशा जगण्याची कहाणी

म्हणजे ही आत्मकथा होय. देशाच्या भल्यासाठी चालवलेल्या चळवळीचा इतिहास म्हणून ती जशी आपल्या समोर येते तशीच ती या चळवळीत तन-मनाने एकरूप झालेल्या सच्चा कार्यकर्त्याचे दर्शनही घडवते. त्याचबरोबर विचारांवर निष्ठा असणं म्हणजे काय याचं भान देणारी ही कहाणी माणूस म्हणून वेगळी मूल्येही आपल्यामध्ये रुजवते. त्यासाठी ती वाचायलाच हवी.

 

2. लढे आणि तिढे

चिकित्सक गप्पा... पुष्पाबाईंशी

मुलाखत : मेधा कुलकर्णी

Ladhe Aani Tidhe

Chikitsak Gappa Pushpabainshi

Mulakhat – Medha Kulkarni

पाने : 252, मूल्य : 300

पुस्तकाचा आकार ५.५ x 8.5 इंच

आणीबाणी असो की रमेश किणी, त्या लढण्यासाठी हिमतीने मैदानात उतरल्या. नाटकाच्या सेन्सॉरविरोधात बोलायचं असो की शिवसैनिकांच्या गुंडगिरीविरोधात, त्या आवाज न चढवता, पण ठामपणे बोलत राहिल्या. पदवीचा मराठीचा अभ्यासक्रम पातळ होऊ नये, यासाठी जिवापाड प्रयत्न करत राहिल्या, तशाच स्त्री अभ्यासाचं पद्धतीशास्त्र मांडत स्त्रियांच्या प्रश्‍नाला एक सामाजिक आयाम देत राहिल्या...

जितक्या आवेशाने त्यांनी लढे दिले, तितक्याच अलवारपणे वेगवेगळ्या संदर्भांतले तिढे सोडवले... आपल्या सगळ्यांना जाणवणारा पुष्पा भावे यांचा हाच ‘युनिकनेस’ वाचकांसमोर यावा, यासाठी हा प्रयत्न. एका मोठ्या काळाचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दस्तावेज!

 

3. फकिरीचे वैभव  

एका कार्यकर्त्याचे वेदनाकथन

विजय यशवंत विल्हेकर

Fakiriche Vaibhav

Eka Karyakartyache Wedanakathan

Vijay Yashawant Vilhekar

पाने : 228, मूल्य : 250

पुस्तकाचा आकार ५.५ x 8.5 इंच

लेखक शेतजमीन नांगरावी तसं आपलं आयुष्य नांगरतो. आयुष्य नांगरताना बहुजीवांचं जगणं उलगडत जातं. त्यातलं काय पकडू आणि काय सोडू असं होतं. तरीही उपेक्षितांचा, विस्थापितांचा अंतर्दाहच आपलासा वाटत राहतो. त्यातूनच चुंबकाप्रमाणे वेदना मनाला खेचून घेते. मग तीच वेदना शब्दातून पाझरू लागते.

तिफणीतून बियाणं पेरत जावं तसं अक्षरांच्या ओळी कागदावर पेरल्या जातात.

शब्द घेऊन त्या उगवतात आणि फकिरीचे वैभव काय असतं याचं दर्शन घडवतात.

कार्यकर्ता जेव्हा सर्वस्वी स्वतःला झोकून देत दुःखीतांचं दुःख हलकं करण्यासाठी झटतो तेव्हा तो खर्‍या अर्थाने उपेक्षित-पीडितांच्या वेदनांनी होरपळून निघतो. पण वेदनांची ही धग त्याला आणखी बळ पुरवते आणि तो पुन्हा पुन्हा नव्या जोमाने लोकांसाठी झटत राहातो... स्वतःला फकीर बनवत... कारण ही फकिरी

त्याला श्रीमंत करत राहाते माणूस म्हणून... कार्यकर्ता म्हणून... त्याचसाठी भूकेलेल्या एका कार्यकर्त्याचं हे वेदनाकथन... त्याच्यातल्या वैभवसंपन्न फकिराचं दर्शन घडवणारं... एकदा वाचायलाच हवं असं सत्यकथन!

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.900.00
  • Rs.720.00