Sports Career
आर्थिक-व्यावसायिक भरारीबरोबरच
क्रीडाविश्वामधील
रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधींमध्येदेखील प्रचंड
वाढ झाली
आहे.
पूर्वी केवळ खेळाडू, प्रशिक्षक
व व्यवस्थापक
एवढ्यापुरत्याच मर्यादित संधी
आता, प्रत्यक्ष खेळ, त्यासाठी
आवश्यक असलेल्या
सोयी-सुविधा-सेवा, पायाभूत सुविधा,
व्यावहारिक-आर्थिक पाठबळ, सेवा-सुविधा
मिळवून
देत असलेले
घटक,
मनोरंजनापासून ते कायद्याशी संबंधित
असलेल्या अत्यावश्यक
अशा सुविधा, अशा अनेकविध
घटकांपर्यंत रोजगार-स्वयंरोजगाराचे क्षितिज विस्तारले
गेले आहे. केवळ
शारीरिक शिक्षण, खेळ वा
व्यवस्थापनच नव्हे, तर
सर्व विद्याशाखांमध्ये क्रीडाविषयक
संधींची प्रचंड
मोठी मागणी सध्या उदयास
आली आहे.
आयटी-इंजिनीअरिंग, मेडिकलप्रमाणे या
संधी आर्थिक
संपन्नतेच्या दिशेने
घेऊन जाणार्यादेखील आहेत.
त्याचबरोबर आपल्या
आवडीच्या क्षेत्रामध्येच करिअर
करण्याचा आनंद
मिळवून देणार्यादेखील ठरत
आहेत.
चला तर
मग,
याच ‘स्पोर्टिंग करिअर’ची
ओळख करून घेऊयात.