Tumche-Aamche Superhero- M.S.Dhoni
Click Image for Gallery
ही कहाणी
आहे महेंद्रसिंह धोनीची...
माहीची!
एकविसाव्या शतकातल्या
भारताच्या
एका लोकप्रिय
क्रिकेटपटूची...
छोट्या शहरातून
जिद्दीनं पुढं आलेल्या
एका स्वप्नाळू
तरुणाची...
ध्यास, चिकाटी आणि
त्याला अफाट मेहनतीची जोड
याद्वारे विजयाला
गवसणी घालणार्या
एका कलंदर
व्यक्तिमत्त्वाची...
ही कहाणी
आहे उत्तुंगतेची, तसंच उदासीचीही!
जल्लोषाची, तशीच निराशेचीही...
लखलखीत उजेडातल्या
उत्सवाची,
तशीच मनाच्या
कोपर्यात दाटलेल्या
काळ्याकभिन्न अंधाराचीही...
उत्तम शिष्याची
आणि उत्कृष्ट नेत्याची...
विजयाची आणि
पराजयाचीही...
आणि अर्थातच
प्रत्येक नकारात्मक गोष्टीवर
कष्टाने मात
करून साकारलेल्या
अपूर्व यशाची!