Aaple Samaj Sudharak- Maharshi Dhondo Keshav Karve
Click Image for Gallery
संस्थामय आयुष्य
जगलेले महर्षी धोंडो केशव
कर्वे म्हणजे आधुनिक भारतातील
एक श्रेष्ठ व कर्ते
समाजसुधारक.
कोकणातील मुरुडसारख्या
छोट्याशा गावातील एका गरीब
कुटुंबातून पुढे आलेल्या कर्वेंनी
महिलांना सक्षम बनवणार्या अनाथ
बालिकाश्रम ते महिला विद्यापीठ
अशा अनेक संस्था मोठ्या
कष्टाने उभारल्या. आधुनिक भारताच्या
सामाजिक सुधारणेच्या इतिहासात; विशेषत: स्त्री-शिक्षण, विधवाविवाह
या बाबतीत महर्षी कर्वे
यांनी आपल्या कार्यातून आणि
ध्येयवादातून एक अपूर्व आदर्श
निर्माण केला.
आजच्या पिढीलाही
प्रेरक ठरेल अशा त्यांच्या
अजोड कार्याची ओळख करून
देणारं हे पुस्तक विद्यार्थी,
पालक, शिक्षकांसह सामान्य वाचकांनाही
नवी उमेद देणारं ठरेल!