Rajmata Jijausaheb

-20% Rajmata Jijausaheb

   जिजाऊसाहेबांच्या अंगी कार्यक्षम व कणखर प्रशासकाचेही गुण होते. शिवरायांच्या बालपणी त्यांनी पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था ठेवलीशांतता व सुव्यवस्था निर्माण केली. शत्रूच्या अत्याचारांनी भयभीत व निराश्रित झालेल्या रयतेस त्यांनी मायेने दिलासा दिला आणि शिवरायांचे भावी स्वराज्य कसे असेल याचे वास्तव दर्शन त्यांनी सर्वांना घडवले. शिवराय वयाने व अनुभवाने मोठे झाल्यावरही जिजाऊसाहेब त्यांच्या प्रमुख सल्लागार होत्या. अत्यंत कठीण संकटाच्या प्रसंगी त्यांना आपल्या मातेचाच आधार वाटत असे. आपल्या गैरहजेरीत मातोश्रींच्या हाती स्वराज्याचा कारभार सोपवून ते जात असत. आग्राभेटीच्या वेळी त्यांच्या मागे जिजाऊसाहेबांनी स्वराज्य सुरक्षित राखले. एकही किल्ला अथवा ठाणे शत्रूला घेऊ दिले नाही. उलट शत्रूचाच एक किल्ला त्यांनी स्वराज्यात आणला. 

अशा या थोर राजमातेचे हे चरित्र शक्य तितक्या सोप्या भाषेतकागदपत्रांचे अवडंबर न माजवता मी सादर करत आहे. महाराष्ट्रातील आघाडीचे प्रकाशकमनोविकास प्रकाशनाचे संचालक श्री. अरविंद पाटकर यांनी जिजाऊचरित्राचा माझ्याकडे आग्रह धरल्याने हे एक प्रकारचे पवित्र कार्य माझ्या हातून पार पडलेअसे मी मानते. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.


राजमाता जिजाऊसाहेब | वसुधा पवार

Rajmata Jijausaheb | Vasudha Pawar

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Vasudha Pawar

  • No of Pages: 180
  • Date of Publication: 25/05/2022
  • Edition: First
  • ISBN: 978-93-91547-57-8
  • Availability: 100
  • Rs.225.00
  • Rs.180.00