Gandhijan Charitramala
आज आपण नवभारताची संकल्पना, ‘आयडिया ऑफ
इंडिया’ हीच विसरलो आहोत. हा देश येथे राहणाऱ्या
सर्वांचा आहे,
त्यावर त्यांचा समान हक्क आहे, समता-न्याय-बंधुता ह्यांवर आधारित देश उभारणे, त्याला
समृद्ध करणे ही ह्या सर्वांची सामायिक जबाबदारी आहे,
ही
झाली ‘आयडिया ऑफ इंडिया.’ द्वेष आणि उन्मादाने भारलेल्या आजच्या वातावरणातून बाहेर
पडण्यासाठी आपल्याला ह्या संकल्पनेचे आणि
तिची पायाभरणी करणाऱ्यांचे पुनर्स्मरण करावेच लागेल. याच भूमिकेतून घेऊन येत
आहोत गांधीजन चरित्रमाला...
अनुराधा मोहनी संपादित या चरित्रमालेत आपल्याला वाचायला मिळतील एकाहून एक
सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीतून साकारण्यात आलेली
आठ दिग्गज व्यक्तिमत्वांची चरित्र म्हणजेच गांधीजनांची चरित्रमाला !
1. सर्वांचे गांधीजी । रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ
2. सावली
नव्हे, जीवनसंगिनी – कस्तुरबा गांधी । सुनन्दा मोहनी
3. क्रांतिकारक
ऋषी विनोबा भावे । मीना श्रीकांत कारंजेकर
4. नियतीशी
करार करणार महामानव- पंडित जवाहरलाल नेहरू ।
हेमंत कर्णिक
5. नवभारताचे
पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद । नंदू गुरव
6. दीपशिखा
सरोजिनी नायडू । डॉ. सिसिलिया कार्व्हालो
7. अहिंसेचा
उपासक खान अब्दुल गफ्फार खान । श्याम पाखरे
8. मातृहृदयी
समतायोद्धा साने गुरूजी । सुचिता पडळकर
गांधीजन चरित्रमाला – संपादन : अनुराधा मोहिनी
Gandhijan Charitramala – sampadan : Anuradha Mohini
Lekhak - Ravindra
Rukmini Pandharinath , Sunanda Mohini , Meena Shrikan Karanjekar,
Hemant
Karnik, Nandu Gurav, Dr, sisilia karvhalo, Shyam Pakhare, Suchita Padalkar