Samsher Kulupghare - Samsher Aani Bhootbangla , Samsher Aani Lamb Mishiwalya Manasacha Rahasya, Samsher Aani Pargrahavarcha Manus

-20% Samsher Kulupghare - Samsher Aani Bhootbangla , Samsher Aani Lamb Mishiwalya Manasacha Rahasya, Samsher Aani Pargrahavarcha Manus

समशेर आणि भूतबंगला

आपला मित्र समशेर कुलुपघरे उर्फ ‘शेरलॉक होम्स’ त्याच्या मित्राच्या निलेशच्या घरी सुट्टीवर राहायला आलेला आहेआणि तो एकटाच नाहीये,

तर सगळी टीमच आहे त्याच्याबरोबरसुट्टीमध्ये धमाल करायचा त्यांचा विचारपण निलेशच्या राहत्या ऐतिहासिक वाड्यात अप्पासाहेबांना चक्क भूत दिसलेलं आहे.

एक नाहीदोन नाही तर तीन-तीन भुतं दिसलेली आहेतएक हवेत तरंगतंएक उंचाड खिडकीतून दिसतंतर तिसरं मेणबत्तीवालं भूत आहे.

भुतं नसतात असं समशेरचं म्हणणंपण ही भुतं पाहिल्याचं सांगणारे साक्षीदार तर पुष्कळ आहेसमशेर नाईलाजाने या तपासकथेत ओढला गेलाय.

आणि मग सुरू होतो पहिला रोमांचकारी तपासआणि समशेरचा दुसरा असाच तपास असतो मोतीच्या शोधाचा.

समशेरचा मित्र गंपूच्या कुत्र्याचं नाव मोतीहा मोतीहा मोती सर्वांचा लाडकाआणि हा मोती नेमका नाहीसा झालायकुणीतरी त्याला पळवून नेलंय!

गंपूने तर मोती सापडेपर्यंत अन्न-पाणी  घेण्याची प्रतिज्ञाच केलीयमग सुरू होतो समशेरचा आणि मित्रमंडळींचा तपासतिसर्या प्रकरणात

एक दुर्मिळ असं लपवून ठेवलेलं पोस्टाचं तिकिट त्याला शोधून काढायचं आहेहोतो का यशस्वी तो या प्रकरणांमध्ये?

जाणून घेण्यासाठी तुम्हाला वाचाव्या लागतील समशेरच्या बुद्धिचातुर्यसाहसकथा!

 समशेर आणि लांब मिशीवाल्या माणसाचं रहस्य

सुनंदाताईला एक लांब मिशीवाला माणूस रोज दिसतोयआश्चर्य म्हणजे हा माणूस वेगवेगळ्या ठिकाणी तिला दिसतोएकच माणूस
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला पुन्हा पुन्हा कसा काय दिसेल असा सगळ्यांचा सवाल आहेत्यामुळे बिचार्या सुनंदाताईवर कोणी विश्वासच ठेवत नाहीपण पाहुणा म्हणून आलेल्या एका मुलाने मात्र खणखणीत आवाजात तिला सांगितलं की ताई माझा तुझ्यावर विश्वास आहे!या मुलाचं नाव समशेर कुलुपघरेयेथून सुरू होतो रोमांचकारी शोधाचा प्रवासआणि या वेळेस चाळीस मिनिटातच एक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणाचं
कोडं सोडवायचं अवघड असं आव्हान समशेरला स्वीकारावं लागलेलं आहेआणि घोड्याचं रहस्य तर अफलातूनचसगळ्यांची मती गुंग करणारं.
पण समशेर या रहस्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतो आहेसुटेल त्याला हे कोडंजाणून घेण्यासाठी वाचाव्या लागतील
समशेरच्या या तीन रोमहर्षक बुद्धिचातुर्यसाहसकथा.

समशेर आणि परग्रहावरचा माणूस

परग्रहावरून काही रहस्यमय जीव शहरात आले आहेतअशी बातमी वेगाने पसरते आहेत्या मुळे शहरात भयाचं वातावरण आहे

त्यातूनसुनंदाताईंच्या मामांनाच ही परग्रहावरची मणसं म्हणजे ‘एलियन’ दिसलेली आहेतआणि म्हणून आपला समशेरत्यच्या सगळ्या ‘टीमसह

या प्रकरणात ओढला गेला आहेसमशेर कसं सोडवतो हे रहस्यकेवळ लॅपटॉपवर काही मिनिटांची चित्रफित पाहून

समशेरने गती गुंग करणारं कोडं सोडवून नंदूभैय्याला मदत केली आहेआणि तिसर्या एका प्रकरणात

अंध संगीतकार श्रीपदराव यांच्या अंगठीची अदलाबदल झालीयआता ही अदलाबदल कोणी केली असेल?

या आणि अशाच रहस्यमय शोधांची उकल समजून घेण्यासाठी वाचा समशेर कुलुपघरे – भारत ससाणे Samsher Kulupghare –  Bharat sasane

1.    1.समशेर आणि भूतबंगला  -  पृष्ठ 72 - 150/-Samsher Aani Bhootbangla   

2.    2.समशेर आणि लांब मिशीवाल्या माणसाचं रहस्य  पृष्ठ 60  - 125/-Samsher Aani lamb mishiwalya mansache rahasya 

     3. समशेर आणि परग्रहावरचा  माणूस   पृष्ठ 60 - 125/-| &l

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Bharat Sasane

  • No of Pages: 192
  • Date of Publication: 25/02/2022
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-91547-31-8
  • Availability: 50
  • Rs.400.00
  • Rs.320.00