Mee Aalo Kuthoon?
अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या आणि निसर्गात सर्वश्रेष्ठ सजीव प्राणी
ठरलेल्या मनुष्यप्राण्याचा मूळ वंशज हा एकपेशीय जीव असावा असं म्हटलं
जातं. परंतु तो मूळ एकपेशीय जीव तरी कशातून जन्माला आला असेल याचा
शोध सोळाव्या-सतराव्या शतकापासून मानव घेत आहे. त्यातून ‘निर्जीवापासून
जीव’की ‘सजीवापासून जीव’ यावर संशोधकांमध्ये तब्बल दोनशे वर्षं वाद रंगला.
लुई पाश्चरने त्यावर पडदा टाकला. परंतु तो टाकताना ‘जीवापासूनच जीवाची
निर्मिती होते’हे सिद्ध करत त्याने ‘जीवापासून जीवाची निर्मिती होते हे खरं आहे,
पण कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याला पृथ्वीचा इतिहास माहिती आहे तिथपर्यंत!’
हे महत्त्वाचं विधान केलं होतं. त्यामुळे हे संशोधन पुढंही चालूच राहिलं. किंबहुना
ते अद्याप सुरूच आहे. त्यामुळे माणसाच्या या शोधाला प्रदीर्घ असा इतिहास आहे.
त्यात अनेक नवे-नवे सिद्धान्त मांडले गेले, अनेक शोध लागले. या साऱ्याचा मागोवा
घेत ‘मी आलो कुठून?’ या पुस्तकात ‘जीव’ या मूलभूत संकल्पनेपासून ते ‘रासायनिक
उत्क्रांतीच्या सिद्धान्ता’पर्यंत झालेल्या स्थित्यंतरांचा आढावा विस्ताराने घेतलेला आहे.
Mee Aalo Kuthoon? | Dr. Ranjan Garge
मी आलो कुठून? । डॉ. रंजन गर्गे
