Khanij Telache Antrang
Click Image for Gallery
हायड्रोजनआणि कार्बन ही निसर्गातील दोन महत्त्वाची मूलद्रव्ये होत.
या दोन मूलद्रव्यांच्या संयोगाने हायड्रोकार्बन रसायने तयार होत असतात.
हायड्रोकार्बन रसायनांची संख्या प्रचंड आहे. पेट्रोलियम पदार्थ हे विविध
हायड्रोकार्बन रसायनांचे बनलेले असतात. या रसायनात कार्बनची संख्या
जेवढी असते, त्यावरून नाना पदार्थ निर्माण केले जातात. जी आज आपण
पेट्रोल, डिझेल, रॉकेल, ऑइल, ग्रीस, वंगण, डांबर या विविध रूपात वापरत
असतो.
हीच ती खनिज तेलं!
पृथ्वीच्या पोटात दडलेली महाऊर्जा! त्या ऊर्जेच्या अंतरंगाचं दर्शन घडवणारं
हे पुस्तक कुमार वाचकांबरोबरच जिज्ञासूंना एका वेगळ्या विश्वाची ओळख
करून देणारं आहे.
Khanij Telache Antrang | Joseph Tuscano
खनिज तेलाचे अंतरंग । जोसेफ तुस्कानो
