India's Most Fearless Set
इंडियाज मोस्ट फिअरलेस
भारतीय लष्करी दलांमधील शौर्याच्या सत्यकथा
एल.ओ.सी.च्या पलीकडे जाऊन सप्टेंबर 2016मध्ये
पाकिस्तानी अतिरेक्यांच्या ठाण्यांवरच्या यशस्वी हल्ल्याचे
नेतृत्व करणारे मेजर, 11 दिवसांत 10 अतिरेक्यांना ठार मारणारा सैनिक,
कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होणार्या भूमीवरून शेकडो लोकांची
सुटका करण्यासाठी, भयावह वातावरणातल्या बंदरावर
जहाज घेऊन जाणारे नौदलातले अधिकारी आणि रक्तबंबाळ स्थितीतही
जळतं जेट विमान चालवणारा हवाई दलाचा पायलट!
ह्या सगळ्यांच्या शौर्याचा कस लावणार्या घटनांचं हे कथन!
काही त्यात प्रत्यक्ष सहभागी असणार्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित,
तर काही त्यांच्याबरोबरच्या मोहिमेत त्यांना अखेरपर्यंत साथ देणार्या
इतरांनी सांगितलेल्या माहितीवर आधारलेल्या, अशा ह्या कथा!
‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’ हे पुस्तक असामान्य शौर्य आणि
कमालीची निर्भयता, ह्यांचं दर्शन वाचकांना घडवतं.
अत्यंत विपरीत परिस्थितीत आणि गंभीर आव्हानं समोर असतानाही,
भारताच्या ह्या शूरवीरांनी ज्या धाडसाने त्यांच्यावर मात केली आहे,
त्याच्या खिळवून ठेवणार्या हकिगती लेखकांनी
ह्यात पुस्तकातून वाचकांपुढे ठेवल्या आहेत.
इंडियाज मोस्ट फिअरलेस 2
दहशतवादविरोधातील लक्षणीय मोहिमांच्या आजवर कुणीही न सांगितलेल्या
हकिगती; 2016 सालच्या सर्जिकल स्ट्राइक्सच्या पार्श्वभूमीवर झालेल्या
दहशतवादविरोधी चकमकींचे खिळवून ठेवणारे प्रत्यक्षदर्शी वृत्तान्त;
काश्मीरमधल्या भरदिवसा रात्रीसारख्या भासणाऱ्या विलक्षण जंगलांमधून
दहशतवाद्यांचा पाठलाग करणारे सैनिक; पाणबुडीवरच्या संपूर्ण क्रूला
वाचवण्यासाठी आपल्या सर्वस्वाची आहुती देणारी तरुण नौदल अधिकाऱ्यांची
जोडगोळी; आपल्या सोबत्यांच्या मृत्यूचा सूड उगवत नाही तोपर्यंत झोपूही
न शकलेला हवाईदलातला एक कमांडो; पाकिस्तानी दहशतवाद्यांवर स्पेशल
फोर्सेसने केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये आत्मा शांत करणारा आयकर खात्यातला
एक ‘बाबू’ आणि अशा अनेक कथा.
त्यांच्या कथा, त्यांच्यात शब्दांत किंवा त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना सोबत
करणाऱ्यांच्या शब्दांत.
‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’च्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या भागात थक्ककरून
सोडणाऱ्या निर्भयतेचं आणि भारतीय सैन्यदलाने कर्तव्य बजावताना
दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचं अत्यंत जवळून दर्शन घडवणाऱ्या या
कथा वाचल्याच पाहिजेत.
‘सैन्यदलाच्या धुरंधर कामगिरीचा खराखुरा आत्मा अगदी बारीक
तपशिलांसह टिपण्याची कामगिरी ‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’ने पुन्हा
एकदा करून दाखवली आहे.’
जनरल बिपिन रावत, माजी सैन्यदलप्रमुख
इंडियाज मोस्ट फिअरलेस 3
लडाखच्या गलवान खोऱ्यातील दगाबाज रक्तपाताच्या गोंधळात आपले
सहकारी सैनिक चीन सैन्याशी जीवन-मरणाची लढाई करत असताना एक
लष्करी वैद्यकीय साहाय्यक आपल्या कर्तव्याच्या आवाहनापलीकडे जात
दोन्हीकडच्या सैनिकांना वैद्यकीय उपचार देण्याचा प्रयत्न करतो.
अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते या चक्रीवादळातून शेकडो लोकांचे जीव
वाचवण्यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवरील कर्मचारी आपले सर्वस्व
पणाला लावतात.
भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आपले अपघातग्रस्त लढाऊ विमान
जमिनीवर कोसळण्याच्या दोन सेकंद आधी विमानातून बाहेर उडी टाकतो
आणि आपला जीव वाचवतो मात्र एक पाय गमावतो.
या पुस्तकात वरील साऱ्यांची अथवा त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याबरोबर
असणाऱ्यांची कथने नमूद आहेत.
‘इंडियाज मोस्ट फिअरलेस 3 या पुस्तकात असाधारण धाडसाच्या आणि
निर्भयतेच्या 10 सच्च्या कथा वर्णन केल्या आहेत. अकल्पनीय अशा प्रतिकूल
परिस्थितीला आणि गंभीर चिथावणीला सामोरे जाताना या भारतीय सैनिकांनी
दाखवलेल्या बहादुरीची, वीरश्रीची झलक या कथांमधून पाहायला मिळते.
India's Most Fearless | Shiv Aroor & Rahul Singh
इंडियाज मोस्ट फिअरलेस । शिव अरूर आणि राहुल सिंह