Aatle Dole
समजा, अचानक असं घडलं, की तुमचा डावा हात तुमचा राहिला नाही…
तो स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्यासारखा वागू लागला!
तुम्ही उजव्या हाताने शर्टाची बटणं लावताय आणि डावा हात
तुमचं न ऐकता ती काढू लागला तर…?
समजा, तुम्हाला कोणताही दृष्टिदोष नाहीये. तुम्हाला दूरचं-जवळचं,
लहान-मोठं सर्व दिसतंय. गुलाबाचं फूल दाखवताच तुम्हाला ते
गुलाब म्हणून तर सोडा; पण एक प्रकारचं फूल म्हणूनदेखील
ओळखता येत नसेल तर…?
एक दिवस अचानक तुम्हाला अर्धं जगच दिसेनासं झालं तर…?
समजा, तुम्हाला कोणीही दिसत नसताना,
शोधूनदेखील कोणी सापडत नसताना, इतरांना ऐकू न येणारे
कुणाच्या बोलण्याचे-खिदळण्याचे आवाज ऐकू येत असतील तर…?
असे आणि अशा तऱ्हेचे अनाकलनीय अनुभव कोणाला येत असतील तर…?
तर, ते ना काळी जादू आहेत, ना जादूटोणा, ना भुताटकी!
ही आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत बिघाड झाल्याची लक्षणं आहेत.
अशाच चमत्कारिक वाटणाऱ्या लक्षणांची-अनुभवांची चर्चा
एका संवेदनशील मनोविकारतज्ज्ञाच्या नजरेतून करण्याचा प्रयत्न
म्हणजे हे पुस्तक!
Aatle Dole | Dr. Rupesh Patkar
आतले डोळे । डॉ. रुपेश पाटकर