Pre-Booking - Vedya Mansanchya Shahanya Goshti

-20% Pre-Booking - Vedya Mansanchya Shahanya Goshti
  • Author: Ajit Abhang
  • ISBN: 978-93-87667-75-4
  • Availability: 47
  • Rs.150.00
  • Rs.120.00

Pre-Booking



वेडाचा शोध घ्यायचामाणूस वेडा का होतो याच्या कारणांशी जाण्याचा प्रयत्न करायचा हा या पुस्तकाचा उद्देश होतातो किती सफल झाला हे वाचक ठरवतीलचपण माणसं वेडी का होतातहे स्वत:च्या अनुभवातून सांगण्याची प्रज्ञा आणि त्यासाठी अविरत बांधिलकीचं समर्पण माझ्यात रुजवणारं हे पुस्तक आहेमी मनोरुग्णालयांच्या परिघात पाऊल ठेवलंतेव्हाच मला भेटलेला प्रत्येक रुग्ण ‘मला तुझी सहानुभूती नकोयतर तुलाच आमच्या सहानुभूतीची गरज आहे’ असं जणू सांगू लागलाप्रत्येक रुग्ण!

 

या पुस्तकाच्या कामादरम्यान माझा जवळपास दोनेकशे रुग्णांशी संबंध आलापन्नास जण माझ्याशी मोकळेपणानं बोललेत्यांच्यातले पंधरा-वीस तर सुसंगत मांडण्याइतपत बोललेया पंधरा-विसांसह उरलेल्या शेकडो रुग्णांतील प्रत्येकाच्या कथेचे धागे येनकेनप्रकारेण माझ्याशी काहीना काही नातं सांगू लागलेत्यांच्या शहाण्याच्या जगातून निवृत्तीचा काळ तर अत्यंत बीभत्सरसाचा परिपोष होता. ‘त्याच निवृत्तीच्या काळातून तू तर जात नाहीस ना’ असा संभ्रम त्यांनी सुरुवातीलाच माझ्या मनात निर्माण केलात्यातील तथ्य माझ्यापातळीवर मी शोधू लागलोया लेखनाला साहित्यिकसामाजिकसांस्कृतिक मूल्य किती असेलयापेक्षाही असंगतीतून आकाराला आलेला एखादा तरी तंतू या विषयाला संगतवार मांडण्यासाठी कधी तरीकुणाला तरी उपयुक्त ठरेलअशी खात्री वाटते.