Nisargpradesh - Havaman

-20% Nisargpradesh - Havaman
  • Rs.90.00
  • Rs.72.00

आपण अनेक नैसर्गिक आविष्कार पाहत असतो. हवामान, गुरुत्त्वाकर्षण, मान्सूनचा पाऊस हे असेच काही. त्यांचं स्वरूप काय आहे? ते कसे तयार होतात? त्यांची जी विविधता आपण अनुभवतो ती कशापायी उत्पन्न होते? या निसर्गाचे सर्वात मूलभूत घटक आहेत अणू आणि रेणू. त्यांचं रंगरूप कसं आहे? त्यांची रचना कशी असते? ती कशी आणि कोणी शोधून काढली? या सगळ्याविषयी अतिशय महत्त्वाची, नवलाची, शास्त्रीय माहिती देणारी ही पुस्तकमालिका!

     ही पुस्तकं वाचून मुलांना काय मिळेल?

·        या विश्वातले सगळे निर्जीव आणि सजीव ज्यापासून बनले आहेत, त्या अणू-रेणूंविषयी सविस्तर माहिती मुलांना मिळेल.

·        अतिशय रंजक भाषा आणि रंगीत चित्रांच्या सुरेख, आकर्षक मांडणीमुळे मुलांना विषयाची सखोल माहिती तर होईलच, शिवाय निसर्गाच्या थक्क करणार्या करामती समजून घेण्याचं कुतूहल जागं होईल.

·        या पुस्तकमालिकेचा उपयोग मुलांना शालेय उपक्रमासाठीसुद्धा करता येईल.

·        मुलांना शास्त्रीय पद्धतीने एखाद्या विषयाची मांडणी करण्याची सवय लागेल.

निसर्गप्रदेशातलं नवलही अशी दर्जेदार, संग्राह्य, वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकमालिका ठरेल. पालकांसाठी, शिक्षकांसाठीही विषय अधिक चांगल्या पद्धतीने शिकवण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरेल