Tumche-Aamche Superhero-Amartya Sen

-30% Tumche-Aamche Superhero-Amartya Sen
  • Author: Atul Kahate
  • ISBN: 978-93-86118-63-9
  • Availability: 493
  • Rs.70.00
  • Rs.49.00

सेन आता अमेरिकेमध्ये आपल्या कामात रमलेले असतात.

अर्थशास्त्र शिकवणं, त्याविषयी चिंतन करणं,

जगासमोरचे प्रश् समजून घेणं आणि ते सोडवण्यासाठी

काय केलं पाहिजे याचा विचार करणं, त्यासाठी संशोधन करणं

अशा कामात ते व्यस्त असतात. त्यांच्या कामाचा आवाका बघितला

की आपल्याला थक्क व्हायला होतं. अमेरिकेमध्ये राहत असूनसुद्धा सेन

यांना आपल्या मायदेशाविषयी खूप प्रेम आहे. म्हणूनच भारतामधल्या

सामाजिक आणि आर्थिक घडामोडींकडे ते बारीक लक्ष ठेवून असतात.

तसंच भारतामधल्या प्रश्नांविषयी ते सातत्यानं बोलत असतात.

आपल्यावर होत असलेल्या टीकेला अजिबात जुमानता

ते आपला दृष्टिकोन अत्यंत निर्भिडपणे लोकांसमोर मांडतात.

अर्थशास्त्राकडे कसं बघितलं पाहिजे आणि हा विषय

इतका महत्त्वाचा का आहे याचं उत्तर

आपल्याला सेन यांच्याकडे बघून मिळतं.