Me Deshala Kay Deoo Shakato
- Author: Srijan Pal Singh
- ISBN: 978-93-86118-86-8
- Availability: 50
- Rs.250.00
- Rs.200.00
देशातील सर्वांत लाडक्या
शिक्षकाच्या स्मृत्यर्थ
‘याचि सम हा’ असे
अत्युत्कृष्ट शिक्षक म्हणून डॉ. कलाम ओळखले जातात.
त्यांचे बोल, त्यांचे
विचार, त्यांची जीवनशैली अनेक दृष्टींनी स्वतंत्र वस्तुपाठ आहेत.
त्यांचा जवळून सहवास
लाभलेले आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत असलेले
त्यांचे शिष्य सृजन पाल सिंग यांनी हे पुस्तक
त्यांना अर्पण केले आहे.
आपल्या गुरूच्या
नीतिमूल्यांची, त्यांनी केलेल्या प्रतिज्ञांची,
त्यांनी तरुणांना दिलेल्या
संदेशांची लेखक या पुस्तकातून उजळणी करतात.
लेखकाने वर्गाच्या चार
भिंतींपलीकडे जाऊन डॉ. कलाम यांचे विचारधन गोळा केले,
ते या पुस्तकातून ते
वाचकांना वाटतात. डॉक्टरांची दिनचर्या, त्यांचे दौरे, विविध राष्ट्रीय
आणि आंतरराष्ट्रीय
विषयांवरील त्यांचे विचार, काही आख्यायिका, काही कोपरखळ्या
अशा विविधांगी विषयांची
‘उत्कंठा वाढवणारी जादूची पोतडी’ लेखकमहाशय
वाचकांसमोर खुली करतात आणि
त्यात वाचक इतके समरसून जातात,
की हा समकालीन भारताचा थोर
सुपुत्र जणू काही आपला दोस्त आहे,
अशी त्यांची भावना होते.
डॉ. कलाम यांच्याविषयीच्या
आजवर अपरिचित असलेल्या अनेक किश्श्यांनी,
त्यांच्या दुर्मिळ
फोटोंनी, काही नमुनेदार मजेशीर ‘कलामी’ पदबंधांनी सजलेल्या
त्यांच्या या आठवणी वाचकांसाठी स्फूर्तिदायक आणि उद्बोधक
ठरतील