Dhyas uttung Himshikharancha
- Author: Anand Bansode
- ISBN: 978-93-86118-00-4
- Availability: 47
- Rs.250.00
- Rs.200.00
माऊंट एव्हरेस्ट. जगातील सर्वोच्च शिखर. या अत्युच्च शिखरावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न आनंद बनसोडे या सोलापूरच्या सामान्य मेकॅनिकच्या घरातल्या युवकाने पाहिलं. आनंदच्या हातात त्यावेळी होते बिघडलेल्या गाड्या दुरुस्तीसाठी लागणारे पान्हे. शैक्षणिक अपयश त्याला पुनःपुन्हा गॅरेजचा रस्ता दाखवत होतं, पण स्वप्न मात्र उत्तुंग शिखरांकडे खेचत होतं आणि त्याच्या ध्यासानं आनंदला झपाटून टाकलं होतं.
या हिमशिखरापर्यंतच्या प्रवासात त्यानं अनेक आव्हानं पेलली. संकटं, अडचणी तर होत्याच; अपमान, अवहेलना, अपयशांनाही तो सामोरा गेला; पण तरीही अत्यंत परिश्रमानं, जिद्दीनं त्यानं अखेर एव्हरेस्ट 'सर' केलंच.
आनंदची कहाणी ही केवळ 'एव्हरेस्टवीर' बनण्याची नाही, तर ही एका प्रचंड मेहनतीची, सकारात्मक ऊर्जेनं स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या युवकाची आहे. हिमालयातला रौद्र निसर्ग आणि पायथ्याच्या कठोर कातळाशी टक्कर देत
शुभ्रधवल यशशिखरावर भारतीय ध्वज रोवलेल्या जिद्दीची आहे. आनंद बनसोडेनं जगातल्या चार खंडांतील सर्वोच्च शिखरांवर गिटारवर राष्ट्रगीताची धून वाजवून विक्रम केला आहे.
एकीकडे आनंद हिमशिखरावरच्या चढाया जशा यशस्वी करत आहे, तसा आपल्या या प्रवासाविषयी तो सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी प्रेरणात्मक भाषणंही देत आहे. जगभरात अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'टेड टॉक'मध्येही त्यानं भाषण दिलं आहे. 'गर्ल रायझिंग' या आंतरराष्ट्रीय मोहिमेत तो सहभागी असून, या मोहिमेचा 'रिजनल अॅम्बेसिडर' म्हणून निवडला गेला आहे.
आनंदच्या उत्तुंग ध्येयाचा थक्क करणारा प्रवास सुरूच आहे..
Dhyas uttung Himshikharancha : Anand Bansode
ध्यास ऊत्तुँग हिमशिखराँचा : आनंद बनसोडे