Abhang Aani Anagha

-20% Abhang Aani Anagha
  • Rs.60.00
  • Rs.48.00

श्री. महावीर जोंधळे पांच्या काव्यगर्भ व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा हा पंचावत्र कवितांचा संग्रह प्रांजळ व अभिनव आहे. यातील भावनांची आणि अल्पाक्षरी शैलीची लय अंतःकरणाला भिडणारी आहे. यात जशी अध्यात्माची ओढ आहे, तशी प्रणयाची धुंद अवस्थाही आहे. यातला शृंगार मनमोकळा, कोमल तसा देहासक्तही आहे. त्यात संयम असला तरी बुजरेपणा नाही. त्यात ग्रामीणतेची नजाकत आहे, पण रासवटपणा नाही. धर्माच्या- सदाचाराच्या मर्माशी भिडण्याची आस त्यात आहे, पण भाबडेपणा नाही. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विव्हळ करणाऱ्या विसंगतीची भेदक जाण त्यात आहे.
- म. द. हातकणंगलेकर

Abhang Aani Anagha : Mahavir Jondhale
अभंग आणि अनंग : महावीर जोंधळे