Krushnavivar

-20% Krushnavivar
  • Rs.90.00
  • Rs.72.00

कृष्णविवर ‘ब्लॅक होल’ हा शब्द आणि त्याची संकल्पना ही जेमतेम गेल्या शतकातीलपण त्याच्या एकूण संकल्पनेचेच वेगळेपण एवढे आहेकी हे काहीतरी गूढ आहेही भावना झाल्यानेच बहुधाहा सगळ्यांचाच कुतूहलाचा विषय बनला आहे.

आकाश-अवकाश-तारे यांच्या बाबतीत बोलतानाअगदी लहान मुलांशी चर्चा करतानात्यांच्याकडून कृष्णविवर म्हणजे काय ?’ अशी विचारणा होतेच होते.

ही कृष्णविवराची संकल्पना काही एकदम आली नाहीकी त्याचा शोध अचानक लागला नाहीताऱ्यांची निरीक्षणे करतानात्यांच्या गतींचेहालचालींचे निरीक्षण करताना आधी ‘श्वेत बटु’ म्हणजे लहान आकाराचे पण वस्तुमान मात्र सूर्याएवढे असणारे तारे सापडलेते कसे बनले असावे याचे संशोधन सुरू असतानात्यांच्यापेक्षा लहान आणि स्वत:भोवती वेगात फिरणारे रेडिओ प्रारणे फेकणारे पल्सार’ म्हणजे ‘न्युट्रॉन तारे’ सापडलेहे तारे ठराविक ताऱ्यांच्या मृत्यूच्या वेळी होणाऱ्या ‘सुपरनोव्हा’ उद्रेकातून तयार होतात हे समजल्यानंतरत्याहून प्रचंड महाकाय ताऱ्यांचा मृत्यू झाला तर काय होईल हा खगोलभौतिकीचा प्रश्न समोर आलात्यातून कृष्णविवराची संकल्पना उदयास आली.

हे न दिसणारे पण प्रचंड गुरुत्वाकर्षण असणारे कृष्णविवर त्याच्या आसपासच्या अवकाशावर जे परिणाम दाखवतेत्यामुळे ते कोठे आहे ते समजतेपण ते निरीक्षणातून प्रत्यक्षात मिळण्यासाठी अनेक वर्षे मधे जावी लागली.

कृष्णविवराकडे घेऊन जाणारी शोधांची ही मालिका या पुस्तकात आपल्याला सचित्र पाहायला मिळेलविद्यार्थीपालक आणि शिक्षकांनाही थोडक्यात आणि नेमके असे कृष्णविवराबद्दल सांगणारे हे पुस्तक आपल्या विज्ञान ग्रंथ खजिन्यात हवेच हवे.

कृष्णविवर । आनंद घैसास

Krushnavivar  | Anand Ghaisas