Anubomb : anupasun anubombparyantcha thararak prawas

-20% Anubomb : anupasun anubombparyantcha thararak prawas
  • Author: Atul Kahate
  • ISBN: 978-93-90060-26-9
  • Availability: 41
  • Rs.280.00
  • Rs.224.00

माणसाला जगातला सगळ्यात सूक्ष्म पदार्थ कोणता याचा शोध घेताघेता अणुचा शोध लागला. अर्थात आता अणुच्या आतमधले सूक्ष्मकण हीसुद्धा सगळ्यात सूक्ष्म गोष्ट नसून दोऱ्यांसारख्या आणि सतत वळवळणाऱ्या स्ट्रिंग्ज सगळ्यात सूक्ष्म असतात असं शास्त्रज्ञ म्हणत असले तरी अणूचा शोध ही अलौकिक गोष्ट होती. विसाव्य शतकाच्या सुरूवातीला अणुची फोट होऊ शकते या संकल्पनेनं भौतिकशास्त्रज्ञ थरारून गेले. त्यात किरणोत्सर्जनाच्या शोधानं भर टाकली आणि त्यातून अफाट कल्पना निघाल्या. अणुचं विभाजन करून त्यामध्ये लपलेली ताकद बाहेर काढणं शक्य झाल्यावर आईनस्टाईनच्या समीकरणानुसार या ताकदीचं प्रमाण महाप्रचंड असल्याचं शास्त्रज्ञांना समजलं. यातून अणुबॉम्बची संकल्पना जन्मली आणि काही दशकांमध्ये ती अमलातही आली.

या सगळ्या प्रवासाचा थरार शब्दांमध्ये माडणं म्हणजे एक मोठं आव्हानच आहे. कारण त्यात इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान, शास्त्रज्ञ, राजकारण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्यांना न्याय देत देत अणुपासून माणसानं अणुबॉम्बपर्यंत केलेला प्रवास आणि त्यानंतरचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नाट्य या सगळ्या गोष्टी या पुस्तकात आहेत. कुठल्याही सामान्य वाचकाची या विषयामधली भूक पूर्णपणे भागवणारं आणि अणुबॉम्बचं मानवतावादी दृष्टिकोनातून भान देणारं हे पुस्तक आहे.

Anubomb : anupasun anubombparyantcha thararak prawas - Atul Kahate
अणुबॉम्ब अणुपासून अणुबॉम्बपर्यंतचा थरारक प्रवास - अतुल कहाते