Akash Kase Pahawe bhag 1,2,3
- Author: Anand Ghaisas
- ISBN: 978-93-943667
- Availability: 28
- Rs.330.00
- Rs.264.00
अलिकडे ‘आकाश दर्शन’ हा कार्यक्रम खूप लोकप्रिय खूप लोकप्रिय झालाय. आकाशातील विविध नैसर्गिक अविष्कारांच्या निरीक्षणांबरोबरच ग्रहतारे आणि नक्षत्रांच्या निरीक्षणांमुळं जे ज्ञान प्राप्त होतं, त्यासाठी जिवंत गुरू हवाच असंही नाही. एखादं साध्या, सरळ, सोप्या भाषेत ही माहिती देणारं पुस्तक हाती असलं की झालं. मग आपल्या इमारतीच्या गच्चीत जाऊनही आपण आपल्या ज्ञान भांडारात भर घालू शकतो. नक्षत्रं आणि राशी यांचा आपण ऐकीव माहितीवर आपल्या नशिबाशी संबंध लावतो. ही नक्षत्रं आणि राशी प्रत्यक्ष पाहणं, हा आनंद प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी घ्यावा. हे ‘एकच प्याला’सारखं आहे. आकाश पाहण्याचं मग व्यसन लागतं.
हे साध्य करण्याचा एक मार्ग आनंद घैसास यांचं हे माहीत हवेत - 101’ या मालिकेतलं ‘आकाश कसे पाहावे’ हे नवं पुस्तक घेऊन वापरावं, संग्रही ठेवावं असं.
- निरंजन घाटे
Akash Kase Pahave : Anand Ghaisas
आकाश कसे पहावे : आनंद घैसास