Yugkarta Shastradnya Dr. Shantiswarup Bhatanagar
स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या पंजाब प्रांताच्या टोकाला
असलेल्या भेरा गावात त्यांचा जन्म झाला. बालपणीच
वडिलांचं छत्र हरपलं. आई, मातुल आजोबा आणि
संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत वेळोवेळी लाभलेल्या सहकार्यशील
शिक्षकांमुळे तो परदेशात जाऊन डॉक्टरेटपर्यंत शिकले.
ऐन स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडात मायदेशी परत आले.
ते होते ‘डॉक्टर शांतिस्वरूप भटनागर'. भारतात आल्यावर
संशोधनाबरोबरच पाश्चात्य वैज्ञानिकांशी सुसंवाद साधत
त्यांनी आपल्या देशात राष्ट्रीय प्रयोगशाळांची पायाभरणी केली.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातल्या
वैज्ञानिक प्रगतीसाठी समन्वय साधणाऱ्या युगकर्त्या शास्त्रज्ञाचा
हा धडाडीपूर्ण जीवनप्रवास...
भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान अपरिचित राहिलेल्या
एका वैज्ञानिकाच्या प्रेरणादायी आयुष्याचं हे चित्रण आहे.
हे खास पुस्तक इतिहासाचं दालन नक्कीच किलकिलं
करणारं आहे.
आज प्रगतीपथावर असलेल्या आपल्या देशात
वैज्ञानिक दिशा सुस्पष्ट होण्यासाठी आवर्जून
वाचायला पाहिजे असे पुस्तक...
Yugkarta Shastradnya Dr. Shantiswarup Bhatanagar | Sudhir Phakatkar
युगकर्ता शास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर : सुधीर फाकटकर