The Behavioral Investor
संपत्ती व ज्ञान द्विगुणित करण्यासाठी साधने उपलब्ध करून द्यावी आणि
त्याच्या साहाय्याने वाचकांनी सर्वार्थाने समृद्ध व्हावे हे ‘विवेकी गुंतवणूकदार`
या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.
संपत्तीविषयी विचार करायचा झाल्यास वित्तीय स्वास्थ्याबरोबरीने मानसिक
स्वास्थ्यही विचारात घ्यायला हवे. कारण तुमच्या निर्णयावर मानसिक स्वास्थ्याचा
मोठा प्रभाव असतो आणि गुंतवणुकीत योग्य निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो.
म्हणूनच डॅनिअल क्रॉसबी आपल्या या पुस्तकात गुंतवणूक निर्णयांवर प्रभाव
टाकणाऱ्या आर्थिक, सामाजिक यासह मानसशास्त्रीय घटकांची तपासणी करतात.
तसेच गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या परताव्यात वाढ व्हावी, त्यांची वर्तणूक सुधारावी
यासाठी व्यावहारिक उपाययोजना सादर करतात.
त्यातून गुंतवणूकदारांच्या आजतागायत असणाऱ्या वर्तणूकीचे सर्वसमावेशक
निरीक्षण हे पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचवतं. इतकंच नाही, तर एक गुंतवणूकदार
म्हणून आपल्यातला विवेक जागवणारं आत्मभान वाढवतं.
एक गुंतवणूकदार म्हणून आपलं वर्तन विवेकाच्या अंगाने सुधारणारं आणि त्याद्वारे
सर्वार्थाने समृद्ध करणारं हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं.
या पुस्तकाचा अर्थवाही व सुगम अनुवाद वित्त व गुंतवणूक सल्लागार अलका गरुड
यांनी केला आहे. राज्य शासनाने (2022) उत्तम अनुवादासाठी पुरस्कार देऊन त्यांना
गौरविले आहे.
डॅनिअल क्रॉसबी
मानसशास्त्रज्ञ व मालमत्ता व्यवस्थापक
मनोवैज्ञानिक, विवेकी वर्तनवादी वित्तीय तज्ज्ञ व मालमत्ता व्यवस्थापक.
वित्तक्षेत्रात विवेकवाद आणणाऱ्यांमधील आघाडीचे नाव. बाजाराच्या
मानसिकतेचा अभ्यास. त्याचा वित्तीय उत्पादनाची रूपरेषा ठरविण्यापासून
ते समभागांची निवड करण्यापर्यंत सर्व क्षेत्रात वापर.
न्यू यॉर्क टाइम्सच्या, ‘पर्सनल बेंचमार्क : इंटिग्रेटींग बिहेविअरल फायनान्स
अँड इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट` या Best Seller पुस्तकाचे सहलेखक आणि
‘नॉक्टर्न कॅपिटल` संस्थेचे संस्थापक.
त्यांच्या संकल्पना ‘हफिंग्टन पोस्ट व रिस्क मॅनेजमेंट` नियतकालिकांमधून
प्रकाशित झाल्या आहेत. ‘वेल्थ मॅनेजमेंट डॉट कॉम` तसेच ‘इनव्हेस्टमेंट न्यूज`
मधून या विषयावर सातत्याने लेखन.
The Behavioral Investor | Daniel Crosby | Translated by : Alaka Garud
द बिहेविअरल इन्व्हेस्टर । डॅनिअल क्रॉसबी | अनुवाद : अलका गरुड