Sagarshala
Click Image for Gallery
कच्छचं रण.
50 डिग्रीपर्यंत चढणारं तापमान!
दूरदूरपर्यंत ओसाड भाग
आणि दलदल!
उपजीविकेचं साधन फक्त
मासेमारी.
लहान-थोर सगळेच
वर्षाचे आठ महिने
या मासेमारीच्याच कामात!
मुलं तर शिक्षणापासून
तुटलेलीच.
अंधश्रद्धा जीवन व्यापून
उरलेली!
2001 च्या भूकंपानंतर
मदतकामासाठी सर्वोदयी विचारांनी
भारलेला गोव्यातील एक शिक्षक बाबा
तिथं जातो.
मैलोन्मैल पायी हिंडत
राहतो.
त्या नवख्या भाषेशी,
संस्कृतीशी जुळवून घेत
राहतो
आणि मुलांच्या शिक्षणाचा
प्रश्न अंगावर घेतो.
झपाटून काम करत
राहतो.
आणि एक शिक्षणचळवळ
उभी राहते -
सागरशाळा ही या शिक्षणचळवळीची कहाणी!
त्या बाबानंच सांगितलेली.