Jim Corbett - Man Eating Leapord of Rudrapryag
मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग | Man Eating Leopard of Rudraprayag
मूळ लेखक : जिम कॉर्बेट | अनुवाद : विश्वास भावे
हिमालयीन फूटहिल्स आणि गढवाल प्रदेशातील चारधाम यात्रा करणार्या
यात्रेकरूंना आणि स्थानिक गढवाली लोकांना, एका नरभक्षक बिबळ्याची प्रचंड
दहशत होती. घराबाहेर पडण्याची भीती वाटणार्या या बिबळ्याने आठ वर्षांत
जवळपास १२५ माणसांचे बळी घेतले होते. जिम कॉर्बेटने आपला सहकारी
इबॉटसनबरोबर या बिबळ्याची शिकार करण्याची मोहीम आखली. मानवी
रक्ताला चटावलेला हा धूर्त बिबळ्या जंगजंग पछाडूनही आणि बंदुकीच्या टप्प्यात
येऊनही सहीसलामत सुटत असे. सतत आठ वर्षे चकवा देणार्या या बिबळ्याने
जिम कॉर्बेटसारख्या निष्णात शिकार्याला पार निराश करून टाकले होते. शेवटी
‘अगदी शेवटचे दहा दिवस प्रयत्न करून पहावा.’ अशा विचाराने सतत दहा रात्री
मचाणावर बसलेल्या कॉर्बेटच्या गोळीला, अखेर अकराव्या रात्री हा बिबळ्या बळी
पडला आणि प्रचंड दहशतीखाली वावरणारी गढवाली जनता भयमुत झाली!
बिबळ्याची दहशत, गढवाल आणि हिमालयीन फूटहिल्सचे चित्रदर्शी वर्णन,
साध्या-भोळ्या गढवाल लोकांचं साधंभोळं वागणं आणि जिम कॉर्बेटचे अथक प्रयत्न
असं सारं काही या पुस्तकात अनुभवायला मिळतं. जणू काही आपण एखादी थ्रिलर
फिल्मच पाहत आहोत असा अनुभव देणारं हे पुस्तक एकदा तरी वाचायलाच हवं!
Jim Corbett, Vishwas Bhave, Advait Gokhale
जिम कॉर्बेट ,विश्वास भावे , अद्वैत गोखले