Gavtat Ugavlelee Akshare
सर्वसमावेशक आणि सामाजिकदृष्ट्याही प्रागतिक असलेल्या आणि वैचारिक भूमिका घेणाच्या संपादकाच्या हाताखाली महावीरची जडणघडण झाली. एका अर्थानं पत्रकारितेच्या खेळासाठी एक मोठं मैदानच प्राप्त झालं. उपसंपादकापासून संपादकापर्यंतचा त्याचा प्रवास इथेच झाला. विकासाचे आणि जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न त्यानं ऐरणीवर आणले. काळ, परिसर, सामाजिक वास्तव मांडताना आलेल्या दाहक अनुभवाचाही अनुभव त्यानं घेतला. प्रश्न समजून घेण्यासाठी पायाला भिंगरी बांधून अखंड फिरत राहिला. लोकांशी बोलत राहिला. चांगल्या-वाइटाशी संघर्ष करीत राहिला.
चोहोबाजूनं फुललेला माणूस म्हणून महाराष्ट्रातील जनता त्याच्याकडे बघते. संपादक असताना तो कवी, कथाकार, ललित लेखक, बालनाटककार म्हणून प्रसिद्धीला आला होता. चाळीस वर्षे पाचवी ते विद्यापीठीय अभ्यासक्रमात असणारा हा लेखक 'प्रतिष्ठान'चा संपादकही होता. हा त्याचा प्रवास जसा विलोभनीय आहे तसाच तो 'आच' आणि 'ऊब' या दोन्हीलाही जोखणारा आहे.
- सदा डुंबरे
Gavtat Ugavlelee Akshare | Mahavir Jondhale