Bharatachi Anugatha
Click Image for Gallery
भारतीय वैज्ञानिक
संस्थांमधील एक अव्वल यशस्वी संस्था असलेल्या भाभा
अणुसंशोधन केंद्राच्या आत
नेमके काय चालते याची उत्सुकता सर्वांच्या मनात
असते. त्याचे कथन या यशाचे
साक्षीदार असलेले आल्हाद आपटे
उत्कृष्टतेबरोबरच
अधिकारवाणीने करू शकतात. अणुकार्यक्रमाचा इतिहास
त्यांनी सुस्पष्टपणे,
संबंधित मानवी कंगोरे, निगडित परिस्थितीचा संदर्भ,
आनुषंगिक मनोरंजक व
चित्तवेधक गोष्टी यांनी सजवून रंजकपणे प्रस्तुत केला
आहे. भाभा अणुसंशोधन
केंद्राचे दार किलकिले करून आतील वैज्ञानिक
विश्वाचे दर्शन घडविणारा
मराठीतील पहिलाच ग्रंथ.