Antarbahya

-20% Antarbahya

अंतर्बाह्य
रत्नाकर मतकरी

गूढकथा ही अनेक स्तरांवर पटाण्याजोगी, मूलतः चांगली लिहिलेली कथा, दर्जेदार साहित्य असायला हवी. सर्व प्रथम ती पात्रे, प्रसंग, मांडणी, त्यामागील आशय, वातावरण, भाषाशैली या सर्वच दृष्टीनी परिपूर्ण कथा असावी लागते. त्याला पोषक अशी तिची निवेदन शैली असावी लागते.

गूढकथा दर्जेदार ठरवण्यासाठी, ती स्वतंत्र हवी. त्याचे कारण असे, की चांगल्या कथेत जे असते, ते चांगल्या गुधकाठेतही यायला हवे, ते काय तर लेखकाचे व्यक्तिमत्त्व ! दुसऱ्या व्यक्तीविषयी आणि एकूणच मानव समाजाविषयी च्या त्याच्या भावना, त्याच्या स्वभावातील सहानुभूती, करून इत्यादी भाव, त्याचा प्रामाणिकपणा, या साऱ्या गोष्टी स्वतंत्र कथेत उतरू शकतात.
माझ्या व्यक्तीमत्वात कालांतराने होत गेलेल्या बदलाप्रमाणे माझी कथाही हळूहळू बदलत गेली. तिच्यातला सामाजिक आशय हा अधिकाधिक ठसठशीत होत गेला... सामाजिक आशयाबरोबर मी, गूढता कशाकशात असते, याचाही समांतर शोध चालू ठेवला. काळ ही गोष्ट अत्यंत गूढ आहे. माझ्या काही कथांत काळ उलटा- सुलटा करून पाहिलेला आहे. पर्यायी विश्व, याही कल्पनेशी मी खेळलेली आहे.
माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक बाजू मला आकर्षित करतात. मनुष्याचे व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य कसे बदलते, हा माझ्या निरीक्षणाचा एक विषय असतो.

अंतर्बाह्य
रत्नाकर मतकरी

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Ratnakar Matkari

  • No of Pages: 184
  • Date of Publication: 2014-01-01
  • Edition: 3
  • ISBN: 978-93-80264-81-3
  • Availability: In Stock
  • Rs.180.00
  • Rs.144.00