Antajichi Bakhar
मग माझा पक्ष कोणता? तर वाटे, महाशयांचा पक्ष,
पुरबीचा पक्ष. रामचंद्रपंत पंडितांचा पक्ष. वहिनींचा पक्ष.
कविराज, गोपाळा, अगदी मोहंतीदेखील
माझे पक्षकार होणेस लायक! परंतु हा तर केवळ जगणार्यांचा,
जगूं पाहाणार्यांचा पक्ष! यांचे हातीं ना सत्ता, ना सैन्य.
तर असा माझा नामर्दांचा पक्ष! एकामागोन एक
नामर्दगीच भोगणें हातीं. वहिनीसाहेब जळाल्या.
फिरंग्यास मध्यें पडणेसाठी हालचाल करावी, वाटलें.
मज नाहीं. पंतांस खोटें नाटें सांगोन अलीवर्दीनें मारिलें.
मज सूड घ्यावा, वाटलें नाहीं.
सिराजानें नाहीं नाहीं तें केलें.
त्यास रोखणेचें धैर्य वोट्सांत. क्लाईव्हांत.
वाटसनांत. कूटांत. माझ्यांत नव्हे.
तर आतां परते महाराष्ट्रांत जावोन मीठ विकावें, हें बरें!
इतिहासाला भव्य-दिव्य आभासी विश्वातून जमिनीवर
आणणारी तिरकस शैलीतील ऐतिहासिक कादंबरी...
Antajichi Bakhar : Nanda Khare
अंताजीची बखर : नंदा खरे