Offer-3 -Wagh , Sinh, Kanha

New Offer-3 -Wagh , Sinh, Kanha

1. वाघ


भारतातला वाघ हा जगभरातील निसर्गप्रेमींचे आकर्षण.

मागील पाव शतकापेक्षा जास्त, जंगलात पायी फिरून केलेल्या याच वाघाच्या

अभ्यासातून वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांचे हे पुस्तक साकारलेे

आहे. वाघांच्या जीवनाबद्दलची सचित्र माहिती प्रत्येक वाचकाला

जंगलाच्या अनोख्या जगात नक्कीच घेऊन जाईल...


2. ‘सिंह


गुजरातच्या गीर अरण्यात जगातील शेवटचे उरलेले काही आशियाई सिंह आजही स्वच्छंदपणे विचरण करतात. या सिंहांचा नामशेष होण्यापासून परतीचा प्रवास तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांनी स्वतः गीरच्या अरण्यात फिरून घेतलेले थरारक अनुभव त्यांनीच काढलेल्या उत्तम फोटोग्राफ्ससोबत यात तुम्हाला अनुभवायला मिळतील.

निसर्गप्रेमी वाचकांसाठी सिंहांपाठी केलेली ही भटकंती हा नक्कीच आनंददायी अनुभव ठरेल.


3.. ‘कान्हा


मध्य भारतातील कान्हा व्याघ्र प्रकल्पाचं

सुप्रसिद्ध जंगल माहीत नाही असा निसर्गप्रेमी सापडणं अवघडच!

अप्रतिम निसर्गसौंदर्य, वाघ व वन्यप्राण्यांची रेलचेल असलेलं

हे अरण्य बाराशिंगा या दुर्मिळ हरिणांचं पृथ्वीतलावरील एकमेव घर आहे.

कान्हातील वन्यजीवनाचं बारकाईने निरीक्षण आणि अभ्यास करताना

लेखक अतुल धामनकरांना अनेक थरारक आणि रोमांचक अनुभवांना

सामोरं जाण्याची संधी मिळाली. त्यांच्या याचअरण्यवाचनाच्या डोळस अनुभवांना

या पुस्तकात ओघवत्या भाषेत त्यांनी शब्दबद्ध केलं आहे.

जंगलात नित्य घडणार्या अनेक घटनांचा जबरदस्त अनुभव या पुस्तकाद्वारे

वाचकांना चार भिंतींत बसूनही घेता येणार आहे.

 Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Atul Dhamankar

  • No of Pages: 384
  • ISBN: 978-93-3
  • Availability: In Stock
  • Rs.720.00