SHIVPUTRA CHHATRAPATI RAJARAM

-20% SHIVPUTRA CHHATRAPATI RAJARAM

पुस्तकाविषयी 

मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या अनेक व्यक्तिरेखा दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. त्यापैकी शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज हे एक होत. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजाराम महाराजांचे पहिले विचिकित्सक चरित्र लिहून ही कमी दूर केली आहे. इतकेच नाही, तर मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड आणि त्यातील राजाराम महाराजांचे मोलाचे योगदान याची खडतर संशोधनाच्या आधारे चिकित्सक मांडणी केली आहे. म्हणूनच जयसिंगराव पवार यांना डॉक्टरेट मिळवून देणारा 1981 मधला हा प्रबंध अमूल्य ठेवा म्हणून लोकांसमोर आला पाहिजे, अशी शिफारस दोन दिग्गज परीक्षकांनी केली होती.

प्रत्येक मराठी माणसाने वाचावी अशी या महत्त्वपूर्ण चरित्राची तिसरी आवृत्ती मनोविकास प्रकाशन वाचकांसाठी नव्या स्वरूपात घेऊन येत आहे.

प्रस्तावना

डॉ. जयसिंगराव पवार

 

राष्ट्राच्या जीवनात सर्वात महत्त्वाचा कालखंड कोणता समजावा, या प्रश्नाचे सरळ -सरळ उत्तर असे की, ज्या कालखंडात राज्यकर्ते परम लोककल्याणी आहेत; प्रजाजन सुखी, समाधानी व समृद्ध जीवन जगताहेत; राज्यातील विद्या, कला व साहित्य यांनी त्यांचा उच्च उत्कर्ष बिंदू गाठला आहे; राज्याला अंतर्गत व बाह्य शत्रूचा कसलाच

धोका नाही; आणि तसा धोका निर्माण झालाच तर राज्याची संरक्षणयंत्रणा पुरेशी सक्षम आहे इत्यादी.

भारतवर्षाच्या इतिहासातील अशा सुवर्ण कालखंडांची उदाहरणे म्हणून गुप्तसम्राट विक्रमादित्य अथवा मोगलसम्राट शहाजहान यांच्या कारकिर्दींचा निर्देश केला जातो. शांतता, सुव्यवस्था, स्थैर्य व समृद्धी यांचा विचार करता हे कालखंड सुवर्णमय समजणे चुकीचेही नाही; पण आमच्या मते राष्ट्राच्या जीवनात सर्वात महत्त्वाचा, सर्वात तेजस्वी कालखंड असतो तो त्यावर कोसळलेल्या आत्यंतिक संकटप्रसंगाचा;

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): JAYSINGRAO PAWAR

  • No of Pages: 526
  • Date of Publication: 5-02-2019
  • Edition: Third
  • ISBN: 978-93-87667-87-7
  • Availability: In Stock
  • Rs.800.00
  • Rs.640.00