Vinasayas Weight Loss

-20% Vinasayas Weight Loss

लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, तसेच मेंदूतील रक्तस्राव अशा अनेक असांसर्गिक रोगांचे भारत देश हा आगर बनला आहे. लठ्ठपणा हा स्वत: एक आजार आहेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्यामुळे उपरोक्त इतर रोग होण्याची जोखीम वाढते. इन्सुलिन हे संप्रेरक आपल्याला लठ्ठ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. कर्बोदके असलेले खाणे वारंवार खाण्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते. या वाढलेल्या इन्सुलिनचे दुष्परिणाम म्हणजेच वर वर्णन केलेले रोग होत.

सध्या लठ्ठपणा कमी करणे हा अनेकांचा धंदा बनला आहे. दुर्दैवाने हजारो रुपये खर्च करूनही लोकांच्या पदरी निराशाच येते. लठ्ठ लोक हताश होतात. या पुस्तकात सुचवलेला उपाय हा साधा-सोपा तर आहेच पण बिनखर्ची आहे. त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही वा महागडी उपकरणे किंवा विशिष्ट अशा आहाराचीही गरज नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणीही व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर हा उपाय अंगिकारू शकेल.

रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी करणारा हा उपाय लठ्ठपणाबरोबरच मधुमेहाच्या प्रतिबंधासाठीही उपयुक्त ठरेल. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा उपाय म्हणूनच बहुमूल्य असाच आहे.

कै. डॉ. श्रीकांत जिचकारांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत शास्त्रोक्त विवेचनाद्वारे समाजा-प्रतीच्या तळमळीने हा उपाय व्याख्यानांद्वारे महाराष्ट्र देशात पोचवला. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी डॉ. जिचकारांचा हा ज्ञानदीप पुस्तकरूपाने सर्व भारतीयांसमोर आणला आहे. आता ही चळवळस्थूलत्व मधुमेहमुक्त भारतया अभियानाच्या रूपाने अग्रेसर होत आहे.

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dr.Jagannath Dixit

  • No of Pages: 144
  • Date of Publication: 15/04/2018
  • Edition: 11
  • ISBN: 978-93-87667-05-1
  • Availability: 100
  • Rs.200.00
  • Rs.160.00