Manakallol

-20% Manakallol

Mental illness has a great deal of stigma and a lack of understanding. So, in their forthcoming book, Mankallol (part 1 and 2), the author duo, Achyut Godbole / Neelambari Joshi has fairly and accurately described Psychological Disorders in a lucid language. The book covers approximately 70 types of Disorders with variety of test cases, history, symptoms, causes and treatments. Readers can also enjoy the captivating references of literature and movies based on certain disorders.

The first part of Mankallol contains Sexual Disorders like erectile dysfunction and pedophilia, Eating Disorders and Addiction disorders etc. Whereas disorders like Depression, Suicide, Alzheimer, Dyslexia, Autism, Stress Disorders, Schizophrenia are included in the second part. The book is a must-read for all the social workers, counselors, family members of patients, school/college faculty members and students. Both the parts of Mankallol is an essential element of every house.


मनकल्लोळ. तुमच्या मानसिक स्वास्थ्याचा पहिला गाइड!
हा आहे मनोविकारांचा इतिहास. किती प्रकार विकारांचे. खाण्याचे. वर्तनाचे. अगदी खरे वाटणार्‍या भ्रमांचे. स्वत:ची ओळख न सापडण्याचे. शरीरसंबंधांचे.
आणि यावर एके काळी तर कवटीला भोक पाडून बिघाड बाहेर काढणे, विनोद ऐकणे आणि विनोद करणे, मानसोपचार घेणे आणि औषधे खाणे, असले इलाज केले जात!
अल्बर्ट आईनस्टाईन या महान शास्त्रज्ञाला डिस्लेक्सिया होता. मायकेल जॅक्सनला नैराश्य आणि बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर होती. अँजेलिना जोलीला तर ईटिंग डिसऑर्डर आहे. आपल्याकडच्या दीपिका पदुकोण या अभिनेत्रीला नैराश्यानं काही काळ ग्रासलं असल्याचं तिनं जाहीर केलंय.

मनोरुग्ण हे समाजाला धोकादायक असतात असं आजही मानलं जातं
. त्यांना नोकरी शोधताना, लग्नासाठी जोडीदार निवडताना, समाजात मिसळताना अनेक समस्या येतात. मनोरुग्णांच्या बाबतीत समाजाची मानसिकता ही अशी निर्दयी असताना, बदलत्या बैठ्या आणि चंगळवादी जीवनशैलीमुळे 2020 सालापर्यंत जगात हृदयरोगानं किंवा कॅन्सरनं मृत्यू होण्याच्या दरापेक्षा नैराश्यानं मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक असेल, असं जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो.

मनोविकार आणि त्यावरचे उपचार यांच्याबद्दल समाजात विलक्षण अज्ञान आणि कमालीचे गैरसमज आहेत. हे जाणून घेऊन अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांनी लिहिलेली मनोविकार या विषयावरची ‘मनकल्लोळ (भाग 1 2)’ ही रसाळ शैलीतील पुस्तकं नुकतीच प्रकाशित झाली आहेत. 
या दोन पुस्तकांत 12 भागांतल्या सुमारे 70 मनोविकारांची, त्यांच्या टेस्ट केसेस, त्याचा इतिहास, लक्षणं, कारणं आणि उपचार अशी तपशीलवार माहिती दिली आहे. तसंच त्या विकारांची चित्रपटात आणि साहित्यात उमटलेली प्रतिबिंबं या पुस्तकात रंजकपणे रंगवली आहेत.
मनकल्लोळ’च्या पहिल्या भागात इरेक्टाईल डिसफंक्शन आणि लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणं म्हणजे पेडोफिलिया यांच्यासारख्या लैंगिकतेबाबतच्या सेक्शुअल डिसऑर्डर्स, वगैरेंचा समावेश आहे; तर दुसर्‍या भागात नैराश्य, आत्महत्येची प्रवृत्ती आणि अल्झायमर, विस्मृती, पार्किन्सन्स अशा मेंदूच्या पेशी झिजल्यानं होणार्‍या डिसऑर्डर्स याबद्दलची माहिती दिली आहे.
मनोविकार’ हा विषय सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, मनोरुग्णांचे कुटुंबीय, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी जाणून घ्यायलाच हवा! ‘मनकल्लोळ’ या पुस्तकाचे दोन्हीही भाग यासाठीच संग्राह्य आहेत!
 

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.369.00
  • Rs.295.20