Sarwansaathi Arogya? Hoy, Shakya Aahe

-20% Sarwansaathi Arogya? Hoy, Shakya Aahe

भारतात अजूनही कोट्यवधी लोक चांगल्या आरोग्यसेवेपासून वंचित आहेत. हे आजचे चित्र बदलूनसर्व जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा देणे शक्य आहेअसे साधार मांडणारे हे पुस्तक आहे.

सरकारच्या औषध-धोरणातील चुका सुधारूनसर्वांसाठी औषधेहे ध्येय गाठणे कसे शक्य आहे, हे सुरुवातीच्या प्रकरणात मांडले आहे. सरकारी दवाखाने, रुग्णालये इथे सर्व आवश्यक औषधे मोफत देणे, तसेच औषध दुकानांतील किमती सध्याच्या एकचतुर्थांश करणे कसे शक्य आहे, याचा उलगडा ही मांडणी करताना केला आहे.

खाजगी वैद्यकीय सेवेत कोणते गंभीर दोष आहेत; ‘सर्वांसाठी आरोग्यसेवाया ध्येयाच्या ते कसे आड येतात; इतर अनेक देशांप्रमाणे भारतातहीप्रमाणित सेवेसाठी प्रमाणित दरया तत्त्वानुसार सरकारने गरजेप्रमाणे खाजगी सेवा विकत घेणे हा त्यावर उपाय कसा आहे, हे मधल्या प्रकरणात आहे.  

सर्वांसाठी आरोग्यसेवाहे ध्येय गाठण्यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवेत कोणत्या आमूलाग्र सुधारणा करायला हव्यात याची चर्चा शेवटच्या प्रकरणात केली आहे.

सखोल अभ्यास जन आरोग्य चळवळीतील प्रदीर्घ अनुभव यांच्या आधारे लिहिलेले हे पुस्तक वाचकाला बरेच काही देऊन जाईल.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dr.Anant Phadke

  • No of Pages: 208
  • Date of Publication: 29/03/2018
  • ISBN: 978-93-86118-80-6
  • Availability: In Stock
  • Rs.250.00
  • Rs.200.00